चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजत
पिंपरी : घरात कोणी नाही, हे हेरून ओळखीच्याच नराधमाने संध्याकाळच्या सुमारास चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखविलं. घरापासून अर्ध्या किलोमीटरवर निर्जनस्थळी नेले. चिमुकलीवर बलात्कार (Pune Crime News) केला. गळा आवळून खून केला. या घटनेने उर्सेसह मावळ परिसर हादरला आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच उर्सेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच घात केल्याचे तपासात समोर आले आहे. गुंडाविरोधी पथकाने १२ तासांत नराधमाच्या मुसक्या (Pune Crime News) आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरात संताप व्यक्त होत आहे.(Pune Crime News)
मावळातील उर्स या परिसरात मोठ्या प्रमाणावर कामासाठी आलेल्या लोकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे या भागात कामगार कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. शनिवारचा दिवस एका कामगार कुटुंबासाठी घातवार ठरला. उर्सेत एका ठिकाणी आई-वडील आणि दोन भावंडे असे कामगार कुटुंब राहण्यासाठी आलेलं होतं. आई-वडील हे दोघेही पोट भरण्यासाठी कामावरती गेले होते तर सहा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा अशी दोन्ही मुले घरातच होती.(Pune Crime News)
रात्री आई कामावरून घरी आल्यानंतर मुलगी घरात नसल्याचं दिसून आलं आणि शोधाशोध सुरू झाली. बराचवेळ शोधल्यानंतरही चिमुकली न सापडल्याने त्यांनी शिरगाव पोलिस स्टेशन गाठलं आणि ही माहिती गुंडा विरोधी पथकास मिळाली. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आणि तपासादरम्यान चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर बारा तासांनी पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या.(Pune Crime News)
आई कंपनीत काम करते. वडील कामानिमित्त पुण्याला ये-जा करतात. मुलीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्याने अत्याचार केला तो सहा वर्षांपासून घराशेजारी राहत होता. संशयित समीर कुमार मंडल हा त्या चिमुरडीच्या घराशेजारीच अनेक वर्षांपासून राहतो. तो सहा वर्षांपासून विवाहित आहे. त्याच्या पत्नीला क्षयरोग झालेला आहे. अपत्य प्राप्तीसाठी त्याच्या बायकोवर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Pune Crime News:चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?
संशयित आणि ती चिमुरडी एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यामुळे त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून अर्धा किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी मुलीला दोन ते तीन किलोमीटर फिरवून नेले. निर्जनस्थळी गेल्यावर त्याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या पँटने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह सोडून पळून गेला.
Pune Crime News: सीसीटीव्हीमुळे ‘तो’ सापडला
सीसीटीव्हीचा आधार घेत, गावातील नागरिकांसोबतची चर्चा करून माहिती घेतली, पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळविले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर नराधामाने गुन्ह्याची कबुली दिली.
Pune Crime News: गुन्ह्यांचा छडा कसा लागला
गुंडा विरोधी पथकाला गुन्ह्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने, पोलिस शिपाई तौसिक शेख आणि रामदास मोहिते यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा नातेवाइकांनी समीर कुमार मंडल (वय ३५, सध्या रा. उर्से, ता. मावळ, मूळ रा. जि. गोंडा, झारखंड) याच्याबरोबर मुलगी चॉकलेट आणायला गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी कंपनीतून नराधमास ताब्यात घेतले. सुरुवातीला तो गुन्हा कबूल करत नव्हता. घटनास्थळावरून सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व प्रकार सांगितला. हा प्रकार मुलगी घरी सांगेल या भीतीने नराधमाने मुलीच्या पँटने तिचा गळा आवळला. रात्री अकरा वाजता कंपनीत कामास गेला
आणखी वाचा
Comments are closed.