किती जणांसोबत झोपलात, रां# आहात की लेस्बियन आहात? कोथरुड पोलीस ठाण्यात काय घडलं?
गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला आली होती. ती तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगरमध्ये होती. पोलीस या संभाजी नगरच्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत कोथरुडपर्यंत (Kothrud News) पोहोचले. त्यावेळी या संभाजीनगरच्या मुलीचं लोकेशन कोथरुडमध्ये आढळळं. त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. येथील रिमांड रुममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Pune News)
कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस (Chhatrapati Sambhaji nagar news) ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कामटे यांनी या तिन्ही मुलींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप झाला आहे. श्वेता एस या मुलीने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत हा सगळा प्रकार सविस्तरपणे सांगितला आहे. पोलिसांनी या मुलींच्या चारित्र्याबद्दल अपमाजनक शब्द वापरले, तसेच तोकड्या कपड्यांवरुन वाईटसाईट बोलले, असा आरोप श्वेता एस हिने केला आहे. पीएसआय कामटे यांनी एका मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि चुकीचा स्पर्श केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तिन्ही मुली पुण्यात नोकरी करतात, कोथरुड परिसरात राहतात. पोलीस सगळे मिसिंग केसची चौकशी या मुलींकडे करत होते. त्यांना कोणत्याही पद्धतीची मारहाण झाली नाही. तपासाचा भाग म्हणून काही प्रश्न विचारल्याचं कोथरुड पोलिसांनी सांगितलं आहे.
त्यांच्यासोबतच घडलेल्या या प्रकाराची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. आणि त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला ‘व्हॉट्सॲप’वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Kothrud Crime: तुम्ही महार-मांगाचे, मग तुम्ही असंच वागणार, तू किती पोरांसोबत झोपलीस? कोथरुड पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर श्वेता एस व्ही या मुलीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत श्वेता एस या मुलीने या तीन मुलींसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. तिने म्हटले की, काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधील एका केसचा तपास करण्यासाठी तेथील पोलीस कोथरुडमध्ये आले होते. त्यांनी तीन दलित मुलींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठी नेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या तिघींना कोथरुड पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या रिमांड रुममध्ये पाच तास ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
कोथरुड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की, तुम्ही महार-मांगाचे ना, मग तुम्ही असचं वागणार आहे, तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपल#$स, तू रां# आहेस, असे प्रेमा पाटील यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दोघीही दिसताही तशाच. तुम्ही किती तोकडे कपडे घालता. तुम्ही रां# आहात का? तुम्ही दारु पीत भटकत असाल. तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिलं असेल, असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
यावर एका मुलीने आमचं ऐकून घ्या अशी विनवणी केली. तेव्हा कामटे यांनी म्हटले की, तू अशीच वागलीस तर एक दिवस तुझा खून होईल. उद्या तुम्हाला नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुमच्यासारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही. आम्ही तुमचं करिअर बरबाद करु, अशी धमकी पीएसआय कामटेंनी मुलींना दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हायप्रोफाईल केसचं प्रेशर आहे दाखवून या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ गेला. यासाठी पोलिसांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही हे प्रकरण लावून धरु, अशी मागणी श्वेता एस या तरुणीने केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=M2EBAVPYMYQ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.