पतीच्या लफड्याचं समजलं; पत्नीने पुण्यातील IT पार्कमधून गर्लफ्रेंडला उचललं, अडीच तास कारमध्ये…

पिंपरी : आपल्या नवऱ्याचं बाहेर एक तरूणीशी संबंध आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने हे सगळं थांबवण्यासाठी चक्क प्रेयसीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी पत्नीने आपल्या भावाला व आईला सोबत मदतीला घेऊन थेट प्रेयसीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांत बुधवारी (दि. 21) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी-चिंचवड आयटी पार्क परिसरात बुधवारी दुपारी थरारक घटना उघडकीस आली. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून एका पत्नीने, तिच्या आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून एका पुरुषाचे 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब त्याच्या पत्नीला कळल्यानंतर त्यांच्यात अनेकदा वाद झाले. पती आणि त्याची प्रेयसी भेटत होते, त्यामुळे पत्नीचा संशय अधिक बळावला. पत्नीने गर्लफ्रेंड पासून दूर रहावे अशी पतीला सांगितले होते. मात्र त्याने न ऐकल्याने पत्नीने हे पाऊल उचललं.

‘पार्सल द्यायचे आहे’ म्हणून बाहेर बोलावले

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ब्रह्मा क्रॉप फेज २, विप्रो सर्कल येथे काम करणाऱ्या महिलेला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. “तुमचे पार्सल द्यायचे आहे,” असे सांगून तिला ऑफिसबाहेर बोलावण्यात आले. बाहेर येताच एका कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरल्या. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तिला ताथवडे व वाकड परिसरात फिरवत मारहाण केली.

‘नवऱ्याचा नाद सोडून दे’ धमकी

कारमध्ये बसवून घेतल्यानंतर आरोपी पत्नीने पीडितेला धमकी दिली, “माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.” त्यानंतर तिला शिवीगाळ करत चोप दिला गेला.

पोलिस प्रशासनाची तारांबळ

दरम्यान, या अपहरणाची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलेचे जबरदस्तीने अपहरण होत असल्याचे स्पष्ट दिसले. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. सीसीटीव्हीवरून कारचा क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वाकड परिसरातून कार ताब्यात घेऊन अपहृत महिलेची सुटका करण्यात आली.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई यांच्याविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. या तिघांनी पोलिसांसमोर चौकशीत कबुली दिली की, “नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळूनच हे कृत्य केले.” पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.