Pune crime news – टास्कचे आमिष पडले 32 लाखांना; विमाननगरमधील तरुणीला सायबर चोरट्यांचा गंडा

पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, उच्चशिक्षितांसह तरुण-तरुणींना जाळ्यात अडकविले जात आहे. प्रामुख्याने अर्धवेळ नोकरी, टास्कचे आमिष, लाईक-शेअरसह विविध प्रकारे सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमुळे ऑनलाईन व्यवहार करतानाही अनेकांच्या मनात नानाविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
पार्टटाईम जॉब करून पैसे कमविता येतील, त्यासाठी दिलेले टास्क ऑनलाईनरीत्या पूर्ण करावे लागेल, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने 32 वर्षीय तरुणीला गंडा घातला आहे. अवघ्या दोन दिवसांत सायबर चोरट्यांनी तरुणीला तब्बल 31 लाख 65 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 17 जून ते 19 जून 2024 कालावधीत विमाननगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी विमाननगरमध्ये राहायला असून, 17 जूनला सायबर चोरट्याने तिला संपर्क केला. पार्टटाईम जॉब करून पैसे कमविता येतील, त्यासाठी दिलेले टास्क ऑनलाईनरीत्या पूर्ण करावे लागेल अशी बतावणी केली. त्यासाठी त्याने तरुणीचे बँक डिटेल्ससह इतर माहिती घेतली. त्यानंतर तिच्याकडून ऑनलाईनरीत्या 31 लाखांवर रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केली आहे.
Comments are closed.