घरात घुसले, आमचे इनरवेअर तपासले, पोलिसांनी काय काय केले?, पुण्यातील तरुणींच्या आरोपाने खळबळ

गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यातील कोथरुड (Kothrud News) पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप (Pune Crime News) केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरुड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तेथील रिमांड रुममध्ये या मुलींचा पाच तास छळ करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून जातीवाचक शेरेबाजी आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे.

सदर प्रकरणी माध्यमांशी बोलताना एक तरुणी म्हणाली की, मुळात ही केस छत्रपती संभाजीनगरमधील होती. याप्रकरणी पोलीस आमच्या घरी आले होते. यावेळी पोलीस आम्हाला जातीवाचक, खासगी आयुष्याबाबत नको नको ते बोलले. तसेच आम्हाला बेदम मारहाण देखील केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. पोलिसांनी कोणतीही सूचना न देता किंवा कोणतेही वॉरंट नसताना आमच्या राहत्या घरी घुसले. त्यानंतर आमच्या घरातील बाथरुम, बेडरुममध्ये घुसले. यावेळी आमच्या इनरवेअरची देखील तपासणी केली, असा खळबळजनक आरोप तरुणीने केला आहे. आम्ही जाब विचारताच तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये चला, आम्ही दाखवतो, अशी धमकीही पोलिसांनी दिल्याचा आरोप तरुणीने केला.

पोलिसांकडून अजूनही गुन्हा दाखल नाही-

पुण्यात कोथरूड पोलिसांकडून शिविगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री साडेतीन वाजता परत गेल्या. मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही. पीडित मुलींसह आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अप्पर पोलीस आयुक्त  मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=rxlzid9kek

संबंधित बातमी:

Sujat Ambedkar Pune Crime: सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटीची तक्रार घेतली नाही, कोथरुडमध्ये दलित मुलींचा छळ, सुजात आंबेडकर संतापले

आणखी वाचा

Comments are closed.