Pune Crime Vaishnavi Hagawane Death Case Nilesh Chavan Laptop received by Pune Police


पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा जीव घेतल्याने हगवणे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली आहे.

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. आता यात वैष्णवीचे सासू-सासरे, नवरा, दीर, नणंद यांना अटक झालीच आहे. पण यात नीलेश चव्हाण हा त्यांचा निकटवर्तीय देखील सहआरोपी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

तेव्हापासून नीलेश फरार आहे. आता त्याच्याकडे असणारी बंदूक सापडली नसली तरीही त्याच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे नीलेश आता पुरता अडकल्याचं दिसत आहे. (Pune Crime Vaishnavi Hagawane Death Case Nilesh Chavan Laptop received by Pune Police)

लॅपटॉप आणि इतर वस्तू पोलिसांकडून जप्त

नीलेश चव्हाणच्या घरावत पोलिसांनी मध्यरात्री मोठी छापेमारी केली आहे. त्याच्या घरातून लॅपटॉप आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

तसंच, नीलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही संशयित डेटा असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. कस्पटे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन नीलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून नीलेश चव्हाण हा फरार आहे.

नीलेश चव्हाणचे कारनामे

नीलेश चव्हाण याने स्वत:च्या पत्नीचा अमानुष छळ केला आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वत:च्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी नीलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

3 जून 2018 ला नीलेश चव्हाणचं लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये नीलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरुममधील सिलिंग फॅनला तसंच घरातील एसीला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचं निदर्शनास आलं. यावेळी तिने विचारलं असता नीलेशने उडवाउडवीची उत्तरं दिली. एकदा त्याच्या बायकोने त्याचा लॅपटॉप पाहिला असता तिला त्यांच्या शरीर संबंधांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले. इतकंच नाही तर त्या लॅपटॉपमध्ये त्याच्या पत्नीला त्याचे अन्य मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओदेखील सापडले. तिने जाब विचारला असता चाकूचा धाक दाखवत तिला नीलेशने धमकावलं. त्यानंतर नीलेशच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर 2022 मध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता.



Source link

Comments are closed.