सुपर सनी मंथ क्रीडा महोत्सवाअंतर्गत पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत अभिजीत त्रिपणकर, संजय शिंदे,इकबाल कुरेशी, हेमंत अडसुळे यांची आगेकूच!

युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अभिजीत त्रिपणकर, संजय शिंदे,इकबाल कुरेशी, हेमंत अडसुळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
बोपोडी येथील रुक्मिणी हॉल येथे सुरू असलेल्या व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत चुरशीच्या लढतीत अभिजीत त्रिपणकर याने मिलिंद कदमचा 25-13, 07-25, 25-22 असा कडवा प्रतिकार केला. संजय शिंदेने अभिजीत पवारवर 10-25, 17-13, 16-13 असा विजय मिळवला. इकबाल कुरेशी याने सूफियान शेखवर 25-00, 25-00 असा एकतर्फी विजय मिळवला.गणेश तावरेने प्रतीक सोमकुंवरचे आव्हान 25-12, 25-14 असे संपुष्टात आणले. हेमंत अडसुळेने रहीम शेखला 25-05, 25-15 असे नमविले.
सदरील स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा.पुणे महापालिका उपमहापौर परशुरामजी वाडेकर, नगरसेवक सनी विनायक निम्हण, नगरसेवक आनंद छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण मंडळ सदस्य पुणे म.न.पा अमित मुरकुटे, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे चे सचिव सुशील गुजर ,खजिनदार सुदाम दाभाडे, प्रमुख पंच संदीप अडागळे, स्वीकृत नगरसेवक वसंतराव जुनवणे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन सहसचिव अभिजीत मोहिते, सतीश भाई शहा, देवा रेड्डी, लक्ष्मण बहिरट ,बाळासाहेब सोरटे, उत्तम बहिरट आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील कॅरम ची उद्घाटनाची फीत मा. उपमहापौर परशुरामजी वाडेकर यांच्या हस्ते कापून उद्घाटन झाले.
निकाल: पुरुष गट: दुसरी फेरी:
विशाल बहीरट वि.वि.नंदू लंगोटे 25 -13 ,25-2.
संजय शिंदे विद्यापीठ अभिजीत पवार 10- 25, 17- 13, 16 -13,
संदीप गायकवाड वि.वि.सागर बारगिर 25-00, 20-14;
मनोज कांबळे वि .वि.संजय कांबळे 22 -16, 25 -7;
इक्बाल कुरेशी वि.वि.सुफियान शेख 25-00, 25-00;
गणेश तवरे वि.प्रतिक सोमकुंवर 25-12, 25-14;
हेमंत अडसुळे वि.वि. रहीम शेख २५-०५, २५-१५;
व्यंकटेश अंबरकर वि.वि.अजय जाधव 25-21, 13-11;
अभिजीत त्रिपांकर वि.वि. मिलिंद कदम २५-१३, ०७-२५, २५-२२;
रुपेश शिंदे वि.वि.अनिकेत आवळे 14-19, 25-11, 25-17;
अनंत भुते वि.वि.संतोष घेवडेकर 25-08, 25-09;
Comments are closed.