डिलीव्हरी बॉयने अत्याचार केल्याचा बनाव, कोंढव्यातील खोटारड्या तरुणीवरच फसवणुकीचा गुन्हा
पुणे : कथित बलात्काराची खोटी माहिती देणं पुण्याच्या तरुणीच्या अंगलट आलं आहे. पुण्यातील कोढवा भागात 2 जुलैला डिलीव्हरी बॉयकडून 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलीस कामाला लागले. पण नंतर याच प्रकरणात ट्विस्ट आला आणि हा मुलगा तिचाच मित्र असल्याचं समोर आलं. आता पुणे पोलिसांनी तरुणीवरच खोटी माहिती दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणानंतर एखाद्या तरुणीने वचपा काढण्यासाठी खोटी कथित बलात्काराची माहिती दिली तर पोलीस तिच्यावरही कारवाई करु शकतात हे स्पष्ट झालं.
तारीख होती 2 जुलै. पुण्यातील कोंढवा परिसरातून बलात्काराची घटना समोर आली. एका उच्चभ्रू सोसायटीत सगळी सिक्युरीटी असूनही एका डिलीव्हरी बॉयनं बलात्कार केल्याचं सुरुवातीला समोर आलं. त्यानंतर पोलिसांनीही सगळ्या बाजूने तपास सुरु केला.
सगळा बनाव असल्याचं समोर
कसं घडलं असेल, सोसायटीच्या सुरक्षेपासून तर सगळी चौकशी केली. बँकेचं पार्सल घेऊन डिलीव्हरी बॉय आल्याचं तरुणीने तक्रारीत सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी सगळ्या पार्सल किंवा कुरीयर कंपनीतून देखील माहिती गोळा केली. पण नंतर पोलिसांनी सगळा तपास केल्यानंतर हा तिचा मित्र असल्याचंच समोर आलं.
पोलिसांच्यावर ताण, कसून शोध
हे सर्व प्रकारचे आहे 2 जुलैला समोर आला. मात्र 3 जुलैला केंद्रीय मंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर होते. ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार होते. त्यामुळे पोलीस प्रशासनावर त्यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्ताचा ताण होता. त्यात बलात्कारातील आरोपी सापडत नसल्यानं त्यांच्यावर टीकाही होत होती. एकीकडे बंदोबस्त तर दुसरीकडे बलात्कारातील आरोपींचा शोध अशी तारेवरची कसरत पोलिसांनी सुरु होती.
ही घटना समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी टीम्स तयार करुन आरोपीच्या मागावर लावल्या. त्याचे सीसीटीव्ही तपासले. अमित शहांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी घटना घडल्यानं पोलिसांवर प्रेशर होतं. एक दोन नाही तर तब्बल 500 पोलीस या आरोपीचा शोध घेत होते.
त्या तरुणाला काहीही माहिती नाही
हे सगळं सुरु असताना तरुणी मात्र सगळं बघत होती. पुण्यात घडलेली ही घटना आणि या घटनेतला आरोपी आपणच आहोत याबाबत तरुण अनभिज्ञ होता. आपल्यालाच पोलीस शोधत आहे हे त्याला माहितीदेखील नव्हतं. मात्र पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केला अन् तरुणाला शोधून आणलं.
तरुण हा मित्रच असल्याचं समोर
सगळी ताकद पणाला लावली आणि अमित शहांच्या बंदोबस्त पार पाडत असताना पोलिसांनी तरुणालादेखील शोधून आणलं. तरुणीची, तिच्या कुटुंबीयांची आणि त्या तरुणाची एकत्र चौकशी केल्यावर पुणे पोलीच चक्रावले. कारण हा तरुण कोणीही डिलीव्हरी बॉय नसून तिचाच मित्र असल्याचं समोर आलं.
तरुणीवर गुन्हा दाखल
ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी मात्र डोक्याला हात लावला. सगळं प्रकरण गुंतागुंतीचं असल्यानं तरुणाला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिलं. काही दिवसांनी मात्र तरुणीलाच खोटी माहिती दिली म्हणून तिच्यावर गुन्हा नोंद केला. तरुणीने कुठल्या उद्देशाने ही खोटी माहिती दिली त्यामागचा तिचा हेतू काय होता याचा तपास पोलीस करणार आहेत.
तरुणीने मित्राला स्वत:च घरी बोलवलं, मात्र शारिरीक संबंध ठेवण्यासाठी ती नकार देत होती. तिच्या मित्राने तिला सांगून शारिरीक संबंध ठेवले खरे, पण त्याचा तिला राग आला. या रागातून तिनं स्वत:च्याच बलात्काराचा बनाव रचला. पण हा राग आता तिला चांगलाच महागात पडला आहे. पुढील काळात कुणीही खोटी तक्रार देऊन पोलिसांचा आणि प्रशासनाचा वेळ वाया घालवेल, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणं शहर अनेक घटनांमुळे चर्चेत असतंच, मात्र बलात्काराच्या घटनांमुळे जास्त चर्चेत आलं. मागील काही घटना बघितल्या तर त्याचा तपास पोलिसांनी अत्यंत गंभीरपणे करुन न्यायनिवाडा केलय. पुण्यातील घटनांची आकडेवारी पाहिली तर दर दिवसाआड एक महिला वासनेची बळी होत असल्याचं समोर येतं.
Pune Rape Case Statistics : पुण्यातील घटनांची आकडेवारी
2023 – 410 बलात्कार,738 विनयभंग
2024- 505 बलात्कार, 868 विनयभंग
जुलै 2025 – 269 बलात्कार, 467 विनयभंग
महिला अत्याचाराची दखल ही गांभीर्याने घेतली जाते. ती घेतलीच जायला हवी, मात्र त्याचा दुरुपयोग तर होत नाही ना, हे पाहणंही गरजेचं असल्याचं कोंढव्यातील या प्रकरणातून समोर आला. तक्रारदार तरुणीवरच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कायद्याचा दुरुपयोग केल्यास काय परिणाम होतात, हे दाखवून दिलं आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.