विशाल गोखले जैन बोर्डिंग ट्रस्टला म्हणाले, 230 कोटी लवकरात लवकर परत द्या, पण ट्विस्टमुळे खळबळ
जैन बोर्डिंग हाऊस आणि गोखले बिल्डर्स: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणाने आता निर्णायक वळण घेतले आहे. जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली आहे. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसचे (Jain Boarding House) अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला यासंदर्भात ई-मेल पाठवला होता. मात्र,आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे.
पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले 230 कोटी परत मिळावेत, असा ई मेल विशाल गोखले यांनी केला होता. मात्र, फक्त गोखलेंनी ई मेल करुन हा व्यवहार रद्द होणार नाही. कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डींगचे विश्वस्त यांच्यामधे झालेल्या करारानुसार जर व्यवहार रद्द झाला तर विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील असणार नाहीत . त्यामुळे विशाल गोखलेंच्या 230 कोटींच काय होणार हा आता प्रश्न आहे. याप्रकरणाची सुनावणी उद्या धर्मादाय आयुक्तांकडे होणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी जर व्यवहार रद्द करण्याचे आदेश देताना गोखलेंचे पैसे परत करण्याचे आदेश दिले तर गोखलेंचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त गोखलेंचे पैसे वाचवणार का, हे पहावे लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर जैन मुनी यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेत या प्रकरणाला आम्हाला राजकीय रंग द्यायचा नसल्याचे स्पष्ट केले. मुरलीधर मोहोळ यांनी माझी भेट घेतली हा विषय समजून घेतला की, हा विषय गरीब विद्यार्थ्यांचा आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात माझी तक्रार नाही, गोखले विरोधातही तक्रार नाही, आम्हाला राजकारण नको आहे. मुरलीधर मोहोळ यांनी मला आश्वासन दिले होते की, हा व्यवहार रद्द होईल. विशाल गोखले आणि मुरलीधर मोहोळ मित्र असल्यामुळे हा व्यवहार रद्द झाला. त्यामुळे मी त्यांना आशीर्वाद देतो, पण अजून हा लढा संपलेला नाही.
हा संपूर्ण व्यवहार जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांनी रद्द करावा. त्यासाठी धर्मदाय आयुक्त यांच्याशी त्यांनी बोलले पाहिजे. मोर्चा सगळ्या ठिकाणी जोरात निघायला पाहिजे, आमची लढाई सरकारशी नाही पण भ्रष्टाचाराविरोधात आहे. 29 तारखेला सकल समाज फक्त जैन समाज नाही सगळे लोकं देशात एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा पत्र लिहिलं जाईल. तसेच एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाईल. याशिवाय, 1 तारखेला जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांच्या घराबाहेर आंदोलन होईल. चकोर गांधी यांनी त्यागपत्र दिलं आणि राजीनामा दिला हे स्वागतार्ह आहे, असे जैन मुनींनी म्हटले.
Ajit Pawar: जैन मुनींची अजित पवारांबद्दल नाराजी
आजच्या पत्रकार परिषदेत जैन मुनींनी जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मौन बाळगून राहण्याच्या भूमिकेवर नापसंती व्यक्त केली. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. इतके सगळे सुरु असताना ते आले नाहीत, ही गोष्ट चूक आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांची जबाबदारी आहे की, या विषयात त्यांनी लक्ष घालावं. पण अजित पवार एकही शब्द बोलले नाहीत, असे जैन मुनींनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.