पार्थ पवार अमेडिया कंपनीत मेजर पार्टनर, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा, पण राजकीय दबावाम
पुणे जमीन घोटाळा पार्थ पवार पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी केला. पार्थ पवार हे अमेडिया कंपनीतील मेजर पार्टनर म्हणजे 99 टक्के भागीदार आहेत. मुंढव्याची जी 40 एकर जागा विकत घ्यायची होती, त्याबाबत अमेडिया कंपनीने एक ठराव मंजूर केला होता. त्या ठरावावर पार्थ पवार यांची सही आहे. त्यामुळे पार्थ पवार (Parth Pawar) या गुन्ह्यातील आरोपी आहेत. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. पार्थ पवारांवर 100 टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे. एखाद्या घरात गांजा सापडला तर फक्त ज्याच्या हातात गांजा आहे, त्यालाच पकडले जात नाही तर घरातील सर्वांना पकडले जाते. त्याच न्यायाने अमेडिया कंपनीशी संबंधित सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे मत विजय कुंभार यांनी व्यक्त केले. (Pune News)
सत्ताधाऱ्यांना सगळ्या गोष्टी कशा लपवायचे हे माहिती असतं, त्यांच्या हातात यंत्रणा असतात. याप्रकरणात निलंबित झालेले सरकारी अधिकारी हे फक्त प्यादे आहेत. बोपोडी आणि मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा उघडकीस येईपर्यंत आम्हाला काहीच माहिती नव्हते, असा कांगावा केला जातो. वरिष्ठांना सांगितल्याशिवाय असा गुन्हा दाखल करण्याचे धाडस कोणताही अधिकारी करणार नाही. कारण या लहान अधिकाऱ्यांना नोकरी जाण्याची आणि बदनामीची भीती असते. त्यामुळे वरिष्ठांची परवानगी असल्याशिवाय हे अधिकारी असे धाडस करणार नाहीत. हे अधिकारी फक्त प्यादे आहेत. या सगळ्याची पूर्ण चौकशी झाल्यास यामागे आणखी कोण आहे, हे समोर येईल, असे विजय कुंभार यांनी म्हटले.
सब रजिस्ट्रार आणि तहसीलदारांना निलंबित करण्यात आले. पण या प्रकरणात कंपनीला प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्याचे दिसत आहे. मात्र, बावधनमध्ये पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा अत्यंत क्षुल्लक आहे. या गुन्ह्यांचा तुकतुकड्यांत तपास होऊन काहीही साध्य होणार नाही. जमीन कशा पद्धतीने हडपली, कागदपत्रं कशी तयार केली, नियम कसे डावलण्यात आले, दस्त कसा मंजूर झाला, हे सगळे पाहता हे गुन्हेगारी प्रकरण आहे. दोन्ही जागा पुण्यातील मोक्याच्या जागा आहेत. त्यामुळे या सगळ्याची सखोल चौकशी झाला पाहिजे, असेही विजय कुंभार यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.