पुण्यात लेझरवर बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत वाढत चाललेल्या लेझर लाईटच्या वापराला अखेर जिल्हा प्रशासनाने लगाम घातला आहे. लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान जिह्यातील विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

Comments are closed.