Pune Loni Kalbhor freestyle fight between 2 groups several injured
पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशामध्ये नुकताच एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले. यावेळी यामध्ये काही महिलांसोबत काही पुरुषदेखील हाणामारी करत असल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडीओ पुण्यातील लोणीकाळभोरमधील असल्याचे समोर आले असून या हाणामारीत एक महिला आणि 2 पुरुष जखमी असल्याचे समोर आले असून पोलिसांनीदेखील याबाबत कारवाई केल्याचे समोर आले आहे. पण हा वाद नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Pune Loni Kalbhor freestyle fight between 2 groups several injured)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणीकाळभोर येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत घडली आहे. लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे रुपांतर वादावादीत झाल्याने दोन गटात दगडफेकीसह धारदार हत्यार आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी 35 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, सदर घटना ही पुण्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या पठारे वस्ती परिसरातील इराणी गल्लीत मंगळवारी (4 फेब्रुवारी) संध्याकाळच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.
या मारहाणीमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून 2 पुरुषदेखील यामध्ये जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देवकर, विलास शिंदे, शैलेश कुदळे, राहुल कर्डिले, शिल्पा हरिहर, मीना वाघाडे, कोमल आखाडे, दीपाली पाडूळे आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी परिस्थिती हाताळून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील कारवाई लोणी काळभोर पोलिस करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Comments are closed.