Pune News – पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी; पैशासाठी क्लास वन अधिकाऱ्याचं संतापजनक कृत्य

पुण्यात संतापजनक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी क्लास वन अधिकाऱ्यानेच पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अधिकारी असलेल्या पत्नीकडे पैशांची मागणी केली. याप्रकरणी अधिकारी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आणि पीडिता दोघेही क्लास वन अधिकारी आहेत. 2020 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. थोडे दिवस सर्व सुरळीत सुरू होतं. मात्र नंतर पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. पतीने पत्नीला त्रास द्यायला सुरवात केली. वारंवार तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. पत्नीवर नजर ठेवण्यासाठी त्याने घरात आणि बाथरुममध्ये स्पाय कॅमेरेदेखील बसवून घेतले होते.
आरोपीने पत्नीचे अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून घर आणि गाडीच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपये आणण्यासाठी पत्नीला ब्लॅकमेल करत होता. अखेर पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.