Pune News – इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग जीवावर बेतली, वीजेचा शॉक लागून आयटी इंजिनिअरचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील वडगाव शेरी येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हॉट वॉटर बॅगचा शॉक लागून एका 30 वर्षीय आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. रोहन कुबाडी असे मयत इंजिनिअरचे नाव आहे. रोहन मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग ठेवून झोपला होता. हॉट वॉटर बॅगमधील बिघाडामुळे विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रोहन गेल्या तीन महिन्यांपासून पुण्यातील वडगाव शेरीतील सोमनाथ नगर येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. रोहनच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. घरमालकाने त्याला वारंवार फोन करूनही त्याने फोन उचलला नाही. यामुळे डुप्लिकेट चावीने घरमालकाने दरवाजा उघडून पाहिले असता रोहनचा मृतदेह पलंगावर आढळला. यानंतर ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला. इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगमधून लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात कळते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.