कोल्हारमधील वाहतूककोंडीने भक्तांचा श्वास गुदमरला, समांतर पुलाचे काम रखडले; नागरिकांमधून संताप व्यक्त

महाराष्ट्र राज्यास दक्षिणोत्तर जोडणारा सेतू म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर-कोपरगाव रस्ता कोल्हारच्या पुलावर वाहतुकीच्या कोंडीत येऊन पोहचतो. शुक्रवारी रात्रीपासून शनिवार, रविवार तर चक्का जामचा दिवस म्हणून प्रसिद्ध झाला आहे. येथील समांतर पुलाचे काम रखडल्याने आठवड्याचे दोन दिवस चक्का जाम आता कोल्हरकरांच्या पाचवीला पुजला आहे. बांधकाम विभाग आणि सरकार मात्र निद्रावस्थेत असल्याने तीन तीर्थक्षेत्रे असलेल्या या महामार्गावर भक्तांचा श्वास गुदमरत आहे.

अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या डागडुजीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, या रस्त्याचे शुक्लकाष्ठ संपत नाही. दोन ठेकेदार अर्धवट काम सोडून गायब झाले. आता हा राज्य महामार्ग केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली वर्ग केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशी भाबडी समजूत येथील ग्रामस्थांमध्ये दिसत आहे.

शिर्डीला श्री साईबाबा, श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूरचे साडेतीन शक्तिपीठ असणारे भगवती मातेचे मंदिर आणि श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भक्तांचा ओघ सतत सुरू असतो. परंतु, या रस्त्याने भक्तांची वाट बिकट करून ठेवली आहे. कोल्हारच्या पुलावर तासन्तास वाहतूककोंडी होत असल्याने परराज्यांतून आलेल्या भक्तांसह प्रवास करणारे नागरिकही त्रस्त होत आहेत.

अहिल्यानगर कोपरगाव रस्त्यावर गेल्या पंधरा ते वीस वर्षात अनगणित अपघात होऊन शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेक वाहनांचे मोठे नुकसान कोल्हारच्या चहु‌बाजूला वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागतात आणि रस्त्याच्या बाजूला असणारे व्यवसाय ठप्प होतात. त्यामुळे या रस्त्याचे काम कधी होणार? असा प्रश्न पडत आहे.

या रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भरच पडत आहे. या रस्त्यावर दररोजच नवनवीन खड्डे तयार होत असल्याने, या रस्त्याची चाळण झाली आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने आणि हा रस्ता पूर्णत्वास जात नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण

झाले. मात्र, या रस्त्याच्या कामास मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचा बळी राज्य सरकार, बांधकाम विभाग आणि आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घेणार असा प्रश्न नागरिक व भक्तगण विचारीत आहेत.

Comments are closed.