Pune News – लोणावळ्यात बुशी डॅमवर किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप

पावसाळी पिकनिकसाठी मुंबई, पुण्यातील पर्यटकांची लोणावळ्यातील बुशी डॅमला नेहमीच पहिली पसंती असते. यामुळे पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी फुललेली असते. मात्र, याच बुशी डॅमवर एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. बुशी डॅमजवळील प्रवाहात एक पर्यटक आनंद घेत असतानाच अन्य एक पर्यटक त्याच प्रवाहाजवळ लघवी करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जवळच उभ्या असलेल्या एका पर्यटकाने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये टिपली. पर्यटकाच्या या कृत्याने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये युजर्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डिजिटल युगात हे व्हिडिओ जगभरात पाहिले जातात. ज्यामुळे आपली प्रतिष्ठा आणखी खराब होईल, असे एका युजरने लिहिले आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हा केवळ सामाजिक जाणीवेचा अभाव नाही तर, मानवी सभ्यतेचा अभाव आहे. निसर्ग तुमचे शौचालय नाही आणि सार्वजनिक जागा तुमचे खासगी खेळाचे मैदान नाही. जागेचा आदर करा. इतरांचा आदर करा. म्हणूनच इतक्या सुंदर ठिकाणांचा नाश होत आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स युजर्सकडून येत आहेत.

Comments are closed.