आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद प
पुणे बातम्या: राज्य निवडणूक आयोगावर (Maharashtra Election Commission) रोज नवनवे आरोप तर होतायतचं, पण आता निवडणूक आयोगानेचं आम्हाला बारामती (Baramati) आणि इंदापूरमध्ये (Indapur) घर घेऊन द्यावं, अशी उपरोधिक मागणी ऐनवेळी पत्ता बदललेल्या मतदाराने निवडणूक आयोगाकडे केलीये. आयोगाला अडचणीत आणणारी ही मागणी करणारे पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) शरद पवारांच्या राष्ट्रवादी (NCP Sharad Pawar Faction) युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख (Imran Shaikh) आणि त्याचे वडील युनूस शेख (Yunus Shaikh) हे आहेत.
इम्रानचे वडील युनूस शेख यांचं नाव इंदापूर विधानसभेत तर आई रबिया शेख यांचं नाव बारामती विधानसभेत ऐनवेळी ट्रान्स्फर करण्यात आलंय. मुळात इम्रान याचं कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून भोसरी विधानसभेत वास्तव्यास आहेत. 2024 च्या विधानसभेला ही इम्रानचे वडील युनूस आणि आई रबिया यांनी भोसरीत मतदान केलंय. याचा पुरावा ही त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
Pune News: निवडणूक आयोगाने बारामती अन इंदापुरात घर घेऊन द्यावं
आयुष्यात आमचा बारामती आणि इंदापूर विधानसभेशी कधी संबंध आला नाही, ना आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं नाव तिकडे ट्रान्स्फर करण्यासाठी अर्ज केला. तरी ही निवडणूक आयोगाने हा स्वतःहून कारभार केलाय, मग आता बारामती आणि इंदापुरच्या त्या पत्त्यावर मला आणि माझ्या पत्नीला त्यांनी घर घेऊन द्यावं, अशी उपरोधिक मागणी करत युनूस शेख यांनी निवडणूक आयोगाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय.
Pune News: …म्हणून हे षडयंत्र रचलं
तर दुसरीकडे मला आगामी पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक लढण्याची इच्छा आहे, मात्र मला तिकीट मिळणं कठीण दिसतंय. असं म्हणत इम्रान शेख यांनी मी माझ्या आई-वडिलांपैकी एकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत होतो. हे विरोधकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी हे षडयंत्र रचलं. आतापर्यंत आम्ही वोट चोरी पाहिली होती, आता उमेदवारांची अन मतदारांची पळवापळवी सुरु झाली, असा आरोप यानिमित्ताने इम्रान शेख यांनी केलाय.
Pune News: नावं दुसऱ्या विधानसभेत कशी काय गेली? नेत्यांचा निवडणूक आयोगाला सवाल
इतकंच नव्हे तर खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी सुद्धा यावरुन निवडणूक आयोगासह विरोधकांना लक्ष केलंय. आमच्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याच्या आई-वडिलांची नावं दुसऱ्या विधानसभेत कशी काय गेली? असा प्रश्न या नेत्यांनी एक्स प्लँटफॉर्मवरून निवडणूक आयोगाला विचारलाय. आता या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून काही उत्तर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.