महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वपक्षीयांवर कारवाई करणार का? रोहिणी खडसेंचा चाकणकरांना सवाल
जळगाव : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास घडली आहे. बावधन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हागवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुळशीतील भुकूम येथे घडली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांना वेळ मिळाला तर या प्रकरणाचा तपास करून स्वपक्षीयांवर कारवाई करणार का ? असा सवाल खडसेंनी केला आहे.
हे अतिशय गंभीर व धक्कादायक आहे
पुण्यातील बावधन येथे वैष्णवी हागवणे या महिलेने आत्महत्या केली आहे. वैष्णवी या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हागवणे यांची सून होत्या.
वैष्णवी यांच्या पतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता, असा आरोप वैष्णवी यांच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूनंतर वैष्णवी यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षांना वेळ मिळाला तर या प्रकरणाचा तपास करून स्वपक्षीयांवर कारवाई करणार का ? की ‘आपलाच’ म्हणून या गंभीर प्रकरणाकडे ही डोळेझाक करणार ?
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेच्या आत्महत्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना या प्रकरणात अटक केली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा फरार आहे. वैष्णवी हवगणे यांनी 16 मे रोजी आत्महत्या केली आहे. जमीन खरेदीसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वैष्णवी हगवणे याचे पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना 21 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल
वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा अशी पोलीस कोठडीत रवानगी केलेल्यांची नावे आहेत. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पसार आहेत. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. वैष्णवी हगवणेचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवीला क्रूर वागणूक दिली. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले. या प्रकरणात सध्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिसेरा राखून ठेवला असून तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
Rajendra Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, अजितदादांचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे फरार, पत्नी, मुलगा आणि मुलीला अटक
अधिक पाहा..
Comments are closed.