खासदार साहेब एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, वसंत मोरे यांच्याकडून खासदार डॉ.कोल्हे यांचा समाचार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणून आम्ही चांगले जागे आहोत आणि कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, अशा शब्दांत शिवसेना संघटक वसंत मोरे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईमध्ये नुकतीच बैठक झाली. या बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर टीका केली होती. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही. तर शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही, असे विधान डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले होते.

अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे संघटक वसंत मोरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत चांगलाच समाचार घेतला आहे. “मा. खासदार साहेब जर निवडणुका झाल्यानंतर म्हणत असतील की शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजुन झोपेतून जागा झाला नाही तर साहेब एक गोष्ट लक्षात ठेवावी आम्ही शिवसेना म्हणून चांगले जागे आहोत आणि कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते…एका जत्रेने देव म्हातारा होत नाही…” असे वसंत मोरे म्हणाले.

Comments are closed.