स्वारगेट बलात्कार प्रकरणी शिवसेनेचा दणका, वसंत मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वारगेट स्थाकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक वसंत मोरे यांनी या बस स्थाकावर उभ्या असलेल्या जुन्या बसमध्ये साड्या आणि दारूच्या बाटल्या सापडल्याचा आरोप केला आहे.
वसंत मोरे म्हणाले की, ”स्वारगेट बस स्थानाकात घडलेल्या घटनेत कर्मचाऱ्यांचा हात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांचे काम आगाराची सुरक्षा करणे आहे. पण जर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कॅबीनसमोरच महिलेवर अत्याचार होत असतील तर, त्यांना कॅबीनमध्ये बसण्याचा अधिकार नाही.”
#वॉच | वसंत मोरे, शिवसेने (यूबीटी) नेते म्हणतात, “येथे घडलेली घटना सुरक्षा केबिनसमोर घडली. जर एखाद्या महिलेवर सुरक्षा केबिनसमोर बलात्कार केला गेला असेल तर कोणालाही तिथे बसण्याचा अधिकार नाही ” https://t.co/pcmfhgfftu pic.twitter.com/fattq15iy0
– वर्षे (@अनी) 26 फेब्रुवारी, 2025
Comments are closed.