Pune News – भरधाव कारची पिकअपला धडक, अपघातात 10 ते 12 जण जखमी

भरधाव कारने पिकअपला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यात काळेवाडीजवळ सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला. सर्व जखमी लोकं पिकअप वाहनाने वेताळ बाबाच्या यात्रेच्या डेकोरेशनसाठी चालले होते.
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे वेताळ बाबाच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची सध्या जय्यत तयारी सुरू असतानाच दौंड तालुक्यातील कानगाव येथील 10 ते 12 जण डेकोरेशनसाठी चालले होते. यावेळी काळेवाडीजवळ त्यांच्या पिकअप वाहनाला भरधाव कारने धडक दिली.
धडक देताच पिकअप वाहन दुभाजक तोडून बाजूला फरफटत गेले. धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहनातील लोकं जखमी झाले. जखमींपैकी 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Comments are closed.