Pune News – महिला पोलीस भरती दरम्यान चेंगराचेंगरी, अनेक उमेदवार जखमी

पुण्यात महिला पोलीस भरती दरम्यान व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे चेंगराचेंगरीची घटना बुधवारी पहाटे घडली. यात अनेक महिला उमेदवार जखमी झाल्या आहेत. महिलांच्या पायाला दुखापती झाल्या आहेत. या घटनेनंतर महिला उमेदवारांच्या पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात महिला पोलीस भरतीसाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. यादरम्यान मुख्यालयाचं लोखंडी गेट कोसळल्याने एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.

पुण्यात महिला कारागृह पोलिसांच्या 513 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी राज्यभरातून तीन हजारांहून अधिक महिला उमेदवार पुण्यात दाखल झाल्या होत्या. मात्र प्रशासनाने यासाठी कोणतेही चोख नियोजन केले होते. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान ही घटना घडली.

Comments are closed.