पुण्यात धरणांमधून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना धोका

सर्व फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे

पुणे जिह्यात आज दिवसभर पावसाचा येलो अलर्ट आणि सायंकाळ नंतर रेड अलर्ट देण्यात आला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुळा मुठा आणि नीरा खोऱ्यातील धरणांमधून विसर्ग सोडण्यात आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परळसह आजूबाजूच्या परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर आमदार अजय चौधरी यांनी महादेव पालव मार्ग रामदूत, ताडीवाला चाळ व वाकडी चाळ, परळगाव येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शाखाप्रमुख मिनार नाटाळकर, उपशाखाप्रमुख नाना पाठक यांच्यासह पालिकेचे अधिकारी, रहिवासी उपस्थित होते.

Comments are closed.