Pune News – 90 कोटी रुपयांच्या चेकला ब्रेक! यशवंत कारखाना जमीन खरेदी प्रकरण
यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करताना संबंधित सर्व वित्तीय संस्थाची देणी, बोजा, मोजणी, जमीन ताबा आदी सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करावी. मगच जमीन खरेदीचा निर्णय घ्यावा असे काही संचालकांनी मासिक बैठकीत थेट बजावले. त्यामुळे तत्काळ सुमारे ९० कोटी रूपयांचा चेक देण्याला ब्रेक लागला.
थेऊर येथील यशंवत सहकारी साखर कारखान्याची सुमारे ९९.२७ एकर जमीन २९९ कोटी रुपयांना पुणे बाजार समितीच्या उपबाजारासाठी खरेदी करण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. उच्च न्यायालयातील दाखल असलेल्या रिट याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढील कार्यवाही करावयाची असल्याचेही शासन निर्णयात नमूद केले होते. पणन संचालाकांकडून समितीला अद्याप या व्यवहारासाठी बारा एक परवानगी दिलेली नाही. असे असतना संचालक मंडळ चेक काढण्याच्या निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत हा व्यवहार थांबवण्याची मागणी फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अॅण्ड ट्रेडने (फॅक्ट) केली होती.
बाजार समितीचे माजी सभापती, संचालक दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर यांच्यासह अन्य संचलकांनी या जमीन खरेदी विक्रीस विरोध नाही. मात्र, दोन्ही संस्थाच्या हितासाठी नियमानुसार आणि कायदेशीर बाबींचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. शासनाने यशवंत जमीन खरेदी-विक्री व्यवहाराला परवानगी दिली आहे. मात्र, जमिनीवर वित्तीय संस्थांचे ताबे असल्याने पैसे कुठे वर्ग करावे हा पेच आहे. त्याची स्पष्टता यायला हवी. याबाबत बाजार समिती वकीलासह सरकारी वकिलांचाही सल्ला घेण्यात यावा. गरज वाटल्यास सामज्यंस्य करार करून हरकती घेण्यात याव्यात. त्याची जाहीर नोटीस काढावी. सर्व बाबी कायद्यात बसत असतील तरच व्यवहार करावा अशी भुमिका मांडली.
जमीन खरेदीला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार निधी उपलब्ध करून सव्वा वर्षात व्यवहार पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सातबार्यावरील सर्व देणी देणे, सरकारी मोजणीने जमिनीचा ताबा घेऊन जेवढी जमीन तेवढेच पैसे दिले जातील. याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच खरेदीखत केले जाईल. – प्रकाश जगताप, सभापती, बाजार समिती, पुणे.
सचिवांची भुमिका वेट अँन्ड वॉच
याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधण्याच्या केला असता तो होऊ शकला नाही. सध्या तरी सचिव यांनी वेट अॅन्ड वॉचची भुमिका घेतल्याचे दिसून येत आहे. या विषयावरील त्यांचा अभिप्राय महत्वाचा ठरणार आहे.
Comments are closed.