Pune Police arrested accused on same road where rally of the accused in Mcoca took place PPK


पुण्यामध्ये मकोकातील आरोपी गणेश कसबे उर्फ गुंड्या तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करत रॅली काढण्यात आली. ज्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते.

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसून त्याचमुळे गुन्हे घडत असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बीड, पुणे, नागपूर व राज्यातील वेगवेगळ्या भागांमधून दररोज गुन्ह्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा यामुळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच आता पुण्यातील एका घटनेमुळे नागरिकांमध्ये तर चांगलीत भीती बसली असून पोलिसांनी त्या घटनेनंतर मोठे पाऊल उचलले आहे. (Pune Police arrested accused on same road where rally of the accused in Mcoca took place)

पुण्यामध्ये मकोकातील आरोपी गणेश कसबे उर्फ गुंड्या तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करत रॅली काढण्यात आली. याचा व्हिडीओ सुद्धा सोसल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ज्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. मकोका असलेल्या गुन्हेगाराची इतकी बिनाधास्तपणे रॅली काढण्याची हिम्मतच कशी होते? अशी टीका पुणे पोलिसांवर सुरू झाली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी सुद्धा या प्रकरणी तत्काळ कारवाई करत नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Torres Scam : 14 कोटी गुंतवणाऱ्या भाजी विक्रेत्यामुळे झाला टोरेसचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?

मकोकातील आरोपी गणेश कसबे उर्फ गुंड्या याची ज्या रस्त्यावरून रॅली काढण्यात आली, पुणे पोलिसांनी त्याच रस्त्यावरून आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याची धिंड काढली. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून मकोकातील आरोपी गणेश कसबे उर्फ गुंड्यासह 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील नऊ आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक करत त्यांची शहरात धिंड काढली. महत्त्वाची बाब म्हणजे पुणे पोलिसांकडून आरोपींची धिंड काढण्याची किंवा अशा प्रकारे कारवाई करण्याची पहिलीच वेळ नाही. तर याआधी सुद्धा पुणे पोलिसांनी आरोपींची अशा प्रकारे धिंड काढली आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम झालेला पाहायला मिळालेला नाही. पुण्यात आजही हत्या, वाहनांची तोडफोड, गुंडांचा धुडगूस, लुटमार अशा घटना घडत आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.



Source link

Comments are closed.