‘ओन्ली किंग ऑफ पुणे’ गुडघ्यावर! पोलिसांनी धिंड काढून उतरवली सराईतांची मस्ती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ओन्ली किंग ऑफ पुणे म्हणत रॅली काढून सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करणाऱ्या तडीपारासह टोळीला खराडी पोलिसांनी अद्दल घडवली आहे. संबंधित आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांची गुडघ्यावर चालवून धिंड काढली. त्यांच्या माफीनाम्याचा व्हिडीओही व्हायरल केला.

निखिल मधुकर कांबळे, सुरेश रूपेश गायकवाड, अनुज नितीन मोरे, ओमकार अनिल चावरे यांना अटक केली आहे. तसेच इतर 8 ते 10 अज्ञातांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. निखिल मधुकर कांबळे याला पुणे जिह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते, मात्र त्याने 28 मार्चला खराडीतील रक्षक नगर गोल्ड सोसायटी परिसरात बेकायदा जमाव जमवून रॅली काढली. त्याचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रसारित केले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

Comments are closed.