मजुराच्या 4 वर्षांच्या बालिकेवर पुणे रेल्वे स्थानकात अत्याचार, नराधम आरोपी गजाआड
मजुरीसाठी आलेल्या एका कुटुंबातील 4 वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच पुणे रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही तासांत नराधम आरोपीला बेडय़ा ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील खांडवा जिह्यातील रहिवासी असून, ते मजुरीच्या कामासाठी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमाभागात आले होते. 17 फेब्रुवारी रोजी हे कुटुंब पुणे रेल्वे स्थानकावरून खांडव्याला जाण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी असल्याने ते कुटुंब फलाट क्रमांक 3 वर झोपले होते. आरोपी हा त्यांच्याच शेजारी बसून प्रवास करत होता. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पीडितेचे वडील बाथरूमसाठी उठले. तेव्हा मुलगी जागेवर दिसली नाही. शोध घेऊनही ती न सापडल्याने त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सगळा प्रकार उघड झाला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचे अढळून आले.
Comments are closed.