Pune rajgurunagar 8 and 9 year child girl body found water drum after molest police arrested criminal-ssa97


Pune Rajgurunagar Crime News : पुण्यातील राजगुरूनगर येथील 8 आणि 9 वर्षांच्या दोन चिमुकल्या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्या होत्या. मात्र…

कल्याणमध्ये एका 12 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिचे अत्याचार केल्याचं प्रकार समोर आला होता. आता पुण्यातून अशीच एक थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे. दोन चिमुकल्या मुलींचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. यातील एका चिमुकलीवर नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, दुसऱ्या मुलीवर नराधमानं अत्याचार केला का? याचा तपास पोलीस करत आहेत.

पुण्यातील राजगुरूनगर येथील 8 आणि 9 वर्षी दोन चिमुकल्या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्या होत्या. मात्र, शोधल्यानंतर सापडल्या नसल्यानं पालकांनी संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, मुलीच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळी लगतच असलेल्या खोलीत एका पाण्याच्या टाकीत दोन्ही मुली मृत अवस्थेत आढळून आल्या.

– Advertisement –

हेही वाचा : काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘EVM’वर संशय, पण सुळेंनी मांडली मित्रपक्षांच्या विरोधात भूमिका

राजगुरूनगर येथील एका वेटरनं हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली. संशयित आरोपी हा 50 ते 55 वर्षांचा असल्याची माहिती समोर येत आहे.

– Advertisement –

“आरोपीनं मुलींना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं आहे. एका मुलीसोबत आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्याचं आतापर्यंतच्या तपासात निप्षन्न झालं आहे. अधिक तपास सुरू आहे,” अशी माहिती खेड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यानं दिली आहे.

हेही वाचा : बीडमध्ये अर्बन नक्षल कोण आहेत, तुमची पोर की जावई? राऊतांचा फडणवीसांना सवाल



Source link

Comments are closed.