Pune rape case 12 days police custody of accused Datta Gade in swargate case in marathi


पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. अशामध्ये घटनास्थळावरून आरोपी फरार झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांचे अनेक पथके त्याच्या मागावर असताना अखेर 70 तासानंतर आरोपीला पकडण्यात यश आले. यानंतर आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी त्याच्या कस्टडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपी दत्ता गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी पोलिसांकडून त्याची 12 मार्चपर्यंत चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.  (Pune rape case 12 days police custody of accused Datta Gade in swargate case in marathi)

हेही वाचा : Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंवर रोज बोलायला वेळ नाही, फडणवीसांनी स्पष्टच सांगितले 

न्यायालयात काय घडलं?

आरोपी दत्ता गाडेला संध्याकाळी 6 वाजत्याच्या सुमारास शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी एस गायगोले यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तसेच, यावेळी आरोपीचे आरोपपत्र हे ऍड वाजिद खान बिडकर यांनी त्याचे आरोपपत्र घेतले. आरोपीच्या वकिलाने यावेळी युक्तिवाद केला की, तरुणीसोबत सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले. त्यावेळी कोणताही प्रतिकार झाला नाही. तसेच, आरोपीच्या भावाचीही दोन दिवस चौकशी करण्यात आली तीही चुकीची असल्याचा युक्तीवाद केला. यावेळी पोलिसांकडून त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. यानंतर दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी असा सापडला पोलिसांच्या तावडीत

मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आलेल्या असताना त्या तरूणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने एका शिवशाही बसमध्ये अत्याचार केला होता. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी 500 पोलीस, ग्रामस्थ, ड्रोन, डॉगस्कॉड असा मोठा फौजफाटा होता. अखेर 70 तासांच्या शोधकार्यानंतर शुक्रवारी (28 फेब्रुवारी) एक ते दिड वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या मुळगावी गुनाट येथून ताब्यात घेतले.

सविस्तर वृत्त लवकरच…



Source link

Comments are closed.