जावयाला सोडवण्यासाठी एकनाथ खडसे बड्या वकीलाला भेटले, बैठक आटोपताच नूरच पालटला, नाथाभाऊ पोलिसांव
पुणे रेव्ह पार्टी प्रांजल खेवलकर: पुण्यातील रेव्ह एका पार्टीवर (Pune Rave Party) 27 जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. सदर प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, काल (28 जुलै) एकनाथ खडसे यांनी प्रसिद्ध वकील असीम सरोदे (Eknath Khadse met lawyer Asim Sarode) यांची भेट घेतली.
एकनाथ खडसे यांनी वकील असीम सरोदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईबाबत दोघांमधे चर्चा झाली. एकनाथ खडसे यांची बदनामी व्हावी यासाठी त्यांच्या जावयाचा व्हीडीओ पोलीसांनी न्यायालयात सादर करण्याच्या आधीच माध्यमांना दिला असा आरोप असीम सरोदे यांनी केला. त्याचबरोबर हे प्रकरण उच्च न्यायालयात मांडण्याबद्दल विचार सुरु असल्याचही असीम सरोदे म्हणाले. दरम्यान, आज एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद देखील आहे. त्यामुळे सदर प्रकरणावर एकनाथ खडसे काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
व्हिडीओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार-
कायदा आणि डॉ प्रांजल खेवलकर यांच्या केसबाबत एकनाथ खडसेंसोबत चर्चा झाली.पोलिसांनी या प्रकरणी चौकशी दरम्यान अनेक कायदेशीर चुका केल्या आहेत. काही लोकांना आरोपी म्हणून बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरात घुसून शूटिंग करणे तो व्हिडीओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार असल्याची पोस्ट असीम सरोदे यांनी केली आहे.
NDPS कायदा आणि डॉ प्रांजल यांच्या केसबाबत एकनाथ खडसे साहेबांसोबत चर्चा झाली.पोलिसांनी या प्रकरणी चौकशी दरम्यान अनेक कायदेशीर चुका केल्या आहेत. काही लोकांना ‘आरोपी’ म्हणून बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरात घुसून शूटिंग करणे तो व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार. pic.twitter.com/dp0ounxdng
– असिम लार्ड (@asimsore) 28 जुलै, 2025
रोहिणी खडसेंनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट-
रोहिणी खडसे यांनी काल (28 जुलै) पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली . रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना 27 जुलै पुणे पोलिसांनी केली अटक केली होती. रोहिणी खडसे यांनी या संबंधी माहिती जाणून घेतली.
ससूनच्या वैद्यकीय अहवालात काय?
सदर प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे अहवालातून समोर आले आहे. पुणे पोलीसांनी अटक केल्यानंतर प्रांजल खेवलकर आणि इतर सहा जणांना पुणे पोलीसांनी अटक केली. त्यांची ससून रूग्णालयात वैदयकीय तपासणी केली असता सात पैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाल पोलीसांनी दिलाय. सातपैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का? हे मात्र न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=6SGV3ADAFDG
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.