Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा) याच्या अटकेनंतर आता राजकीय वातावरण देखील तापल्याचं दिसून येत आहे, या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकरांसह अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर या प्रकरणी चाकणकरांवर अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत, अशातच आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज चाकणकरांवर अंत्यत गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची आणि राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकरांनी नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. या लोकांनी अनेक वेळी अनेक लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे, काही पिडीत म्हणतात की, रूपाली चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या, काही पिडीतांचं म्हणण आहे की, चाकणकर आमच्यावरती प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणे गरजेचे आहे. कारण कॅप्टन खरात आणि चाकणकर यांचं किती वेळी बोलणं झालं, यासाठी साडीआर गरजेचे आहे, कॅप्टनला वाचवण्यासाठी चाकणकरने कोणाला फोन केले का? कॅप्टनने कोणाला फोन केले का? हे तपासणं गरजेचं आहे, असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
Comments are closed.