Pune Swargate ST Bus Depo : स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाचं आरोपपत्र 15 दिवसांत दाखल

Pune Swargate ST Bus Depo : स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाचं आरोपपत्र 15 दिवसांत दाखल
स्वारगेट एसटी बसस्थानकात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्रित करून येत्या १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
या प्रकरणात तरुणीसह तिचे कुटुंबीय आणि मित्राचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
पीडित तरुणी स्वारगेट परिसरात ज्या वाहनाने आली त्या कॅबचालक आणि संबंधित शिवशाही बसच्या वाहकाचाही जबाब घेण्यात आला आहे.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण, ससून रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय चाचणी अहवाल, बसच्या न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल अशा पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश असेल.

Comments are closed.