‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाअंतर्गत निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत काता प्रकारात पुणे संघाला विजेतेपद

युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाअंतर्गत निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत काता प्रकारात पुणे संघाने, तर फाईट प्रकारात नवी मुंबई या संघांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
सुस रोड येथील सनी वर्ल्ड येथे विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेत पुणे शहर, पुणे ग्रामीण, नवी मुंबई, सातारा, शिरवळ, फलटण या ठिकाणांहून ८०० कराटेपटूंनी आपला सहभाग निश्चित केला होता. हि वैयक्तिक काता आणि फाईट प्रकारात घेण्यात आली.
स्पर्धेत काता प्रकारात संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे संघाने १० सुवर्ण पदक, १६ रौप्य पदक आणि ३० कांस्य पदकांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला. अमोल कोरडे यांच्या सातारा संघाने ८ सुवर्ण, १२ रौप्य आणि २५ कांस्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकावला. सुरेखा मोरे यांच्या पुणे ग्रामीण संघाने ५सुवर्ण, ६ रौप्य व १६कांस्य पदकांसह तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेत फाईट प्रकारात किशोर इथापेच्या नवी मुंबई संघाने १५ सुवर्ण, २५ रौप्य व ४०कांस्य पदकांसह अव्वल क्रमांक पटकावला. पूजा वैरागेच्या पुणे संघाने १० सुवर्ण, १२ रौप्य , २५ कांस्य पदकांसह द्वितीय क्रमांक आणि निलेश इथापेच्या सातारा संघाने ५ सुवर्ण, ७ रौप्य , १५ कांस्य पदकांसह तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत एकूण १,५०,००० रुपयांची पारितोषिके, प्रशस्तिपत्रक आणि पदके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमेश्वर फाउंडेशनच्या संचालिका मधुरा निम्हण, बजाज ब्रोकिंगचे नॅशनल हेड आशिष चुग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार: ८ वर्षाखालील मुले:
१. आरव ठाकूर (पुणे), २. स्वराज पाटणे (सातारा);
८ वर्षाखालील मुली: १. स्पंदन गोपाळे (नवी मुंबई), २. यज्ञा कुंजीर (पुणे);
१० वर्षाखालील मुले: १. शौर्य सोनवणे, २. अक्षय ठाकूर(पुणे);
१० वर्षाखालील मुली: १. ओवी इथापे (नवी मुंबई), २. तृषा निकम(सातारा);
१२ वर्षाखालील मुले: १. सर्वेश जोशी (पुणे), २. अनिमेश सोनवणे (शिरवळ);
१२ वर्षांखालील मुली: १. ओवी माधवी (नवी मुंबई), २. दुर्वा सोनवणे (शिरवळ);
१४ वर्षाखालील मुले: १. आदर्श अंभोरे (नवी मुंबई), २. आरुष वाणी (सातारा);
१४ वर्षांखालील मुली: १. अदिती शहा (नवी मुंबई), २. खुशी गवस (नवी मुंबई);
१६ वर्षाखालील मुली: १. स्पर्शिका नवले (नवी मुंबई), २. श्रुती नवले ( नवी मुंबई);
१६ वर्षाखालील मुले: १. श्रीराज माने (शिरवळ), २. अभिजित वैराट (सातारा).
Comments are closed.