Video ड्रायव्हरने चुकून रिव्हर्स मारला, पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली
पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. आज याच पुण्यात एका कारचा विचित्र अपघात देखील पाहायला मिळाला. पुण्यातील विमान नगर भागातील शुभ अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून गाडी काढत असताना चालकाने चुकून रिव्हर्स गेअर टाकला. त्यामुळे गाडी थेट इमारतीची भिंत तोडून खालच्या मजल्यावर कोसळली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
पुण्यातील विमान नगर येथील शुभ अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये चालकाने चुकून गाडी रिव्हर्स घेतली. त्यामुळे ही गाडी थेट भिंत तोडून खाली कोसळली. pic.twitter.com/3prkV7gKus
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 22 जानेवारी 2025
व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक काळ्या रंगाची होंडा सिटी पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून खाली पडताना दिसत आहे. या गाडीमध्ये काही लोकंही बसलेली दिसत असून सुदैवाने एवढा मोठा अपघात होऊनही कोणालाही गंभीर इजा झाली नाही. हा अपघात चालकाच्या चुकीमुळे घडल्याचे सांगितले जात आहे.
Comments are closed.