WMPL 2025: पुणे वॅारियर्सचा दमदार संघ जाहीर! पाहा संपूर्ण स्क्वॅाड…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) या महिलांच्या टी-20 फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला यंदा गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर भव्य प्रारंभ होणार आहे. MCA अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महिलांना हक्काच क्रिकेटिंग व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा 5 जूनपासून रंगणार आहे. (WMPL Begins From 5 june)
या लीगमध्ये पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर स्मॅशर्स आणि रायगड रॉयल्स हे चार फ्रेंचायझी संघ सहभागी होणार आहेत. एकूण 12 लीग सामने खेळवले जाणार असून अंतिम सामना 14 जून रोजी होईल.
WMPL 2025 साठी पुणे वाॅरियर्सचा संघ- अनुजा पाटील, वैष्णवी शिंदे, सिम्रन दबास, सानिया गवाडे, श्रद्धा गिर्मे, श्वेता माने, श्वेता सावंत, खुशी मुल्ला, इशिता खाले, ऋषिता सैकार, नीति अग्रवाल, प्रांजली पीसे, समृद्धी दाले, चिन्मयी बोरफले, सुहानी कहांडाळ, उत्कर्षा कदम, सेजल सुतार, शिवांशी कपूर, अक्षया जाधव, समृद्धी शिंदे, शालाका काणे, सौम्यलता बिराजदार आणि अभिलाषा पाटील (Pune Warriors Squad For WMPL)
चाहत्यांनी स्टेडियमवर येऊन सामने पहावेत
या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, सर्व प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघांना व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. (Maharashtra Premier League 2025: Free Stadium Entry, Grand Drone Show at Opening Ceremony)
थेट हातातील मोबाईलवर पाहता येणार सामने
हे सर्व सामने JioCinema (JioHotstar) या OTT प्लॅटफॉर्मवर आणि Star Sports 2 या टीव्ही वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जातील. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या देखील ही रोमांचक स्पर्धा पाहण्याची संधी मिळणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioCinema)
Comments are closed.