Viral Post: ‘हवा वैगरे आम्ही सोडत नाही…’ गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी पुणेरी दणका
पुणेकरांचा तिरकसपणा आणि स्पष्टवक्तेपणा सगळ्यांनाच माहीत आहे. कुठेही थेट मुद्द्यावर बोलणे, विनोदाच्या ढंगातही टोला लगावणे, आणि त्यातूनही शिस्त शिकवणे ही पुणे शहराची खास शैली आहे. ही शैली विविध ठिकाणी दिसते, पण पुणेरी पाट्य म्हणजे या सगळ्याचं गमतीशीर आणि मार्मिक रूप. पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट पुणेरी पाटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आणि का होऊ नये? या पाटीने थेट ‘गेटसमोर गाडी लावणाऱ्यां’ना असा दणका दिला आहे की वाचणाऱ्यालाही भीती वाटेल. (puneri no parking pati viral)
पाटीवर काय लिहिलंय?
पुण्यात एका घरासमोर लावलेली ही पाटी म्हणते “गेटसमोर गाडी लावल्यास सर्व्हिसिंग करून बिल देण्यात येईल… हवा वगैरे आम्ही सोडत नाही.”म्हणजेच कोणत्याही कायदेशीर नोटीस किंवा पोलिसांच्या दंडाची वाट न पाहता, पुणेकरांनी आपल्या पद्धतीने गाडी पार्क करणाऱ्यांना शिस्त लावायचं ठरवलं आहे.
ही पाटी Omkar Chirme या एक्स (पूर्वीचे ट्विटर) युजरने शेअर केली असून, अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स करत पुणेकरांच्या या शैलीला सलाम ठोकला आहे.
‘पुणे तिथे काय उणे?’ या म्हणीला जागणारा प्रकार
पुण्यात ‘नो पार्किंग’च्या समस्या नवीन नाहीत. गेटसमोर गाड्या उभ्या करणे, सोसायटीच्या मार्गात अडथळा निर्माण करणे हे वारंवार घडणारे प्रकार आहेत. पण या समस्येवरची पुणेरी शैलीतली प्रतिक्रिया म्हणजे ‘हवा सोडणं नाही, थेट बिल पाठवणं’ ही एक वेगळीच पातळी आहे. पुणेरी पाट्या हे फक्त मजेशीर वाक्यं नव्हेत. त्या पुणेकरांच्या बोलण्याच्या थेट पद्धतीचं, मिश्किल आणि सामाजिक जबाबदारीचंही प्रतीक आहेत. कधी पान थुंकणाऱ्यांवर, कधी बेशिस्त वाहनधारकांवर, तर कधी आरडाओरड करणाऱ्यांवर अशा पाट्यांमधून टोमणे दिले जातात.
Comments are closed.