अर्शदीप सिंगसोबत भेदभाव? प्रशिक्षकाने इंग्लंड दौऱ्याबद्दल केले खळबळजनक आरोप

अरशदीप सिंग कसोटी क्रिकेट: भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते, पण तो सर्व 5 सामन्यांमध्ये बेंचवरच बसलेला दिसला. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीदरम्यान अर्शदीप 4 सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध होता, ज्यावरून अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले होते. आता इंग्लंड दौऱ्याबद्दल पंजाबच्या प्रशिक्षकांनी खळबळजनक आरोप केले आहेत. आशिया कप 2025च्या आधी, गोलंदाजी प्रशिक्षक गगनदीप सिंगने अर्शदीपबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. (Arshdeep Singh England Tour 2025)

पंजाबचे गोलंदाजी प्रशिक्षक गगनदीप सिंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अर्शदीप सिंगबद्दल सांगितले की, “काही महिन्यांपूर्वी तो इंग्लंडमध्ये असताना मी त्याच्याशी बोललो होतो. त्याला संधी मिळत नसल्याने तो अस्वस्थ होता. मी त्याला फक्त एवढंच सांगितलं की, ‘तुला तुझ्या वेळेची वाट पाहावी लागेल.’ मला वाटतं त्याला इंग्लंडमध्ये खेळवायला पाहिजे होतं, कारण तो एक स्विंग गोलंदाज आहे आणि तो उंचही आहे, सर्वकाही जुळून येत होतं. मला संघाची रचना माहीत नाही, कदाचित प्रशिक्षक (गौतम गंभीर) आणि कर्णधार (शुबमन गिल) यांचा त्याच्यावर विश्वास नसेल.” (Gagandeep Singh coach statement)

पुढे बोलताना गगनदीप सिंग म्हणाले, “तो अधिक स्विंग आणि अचूकतेने एक चांगला गोलंदाज बनू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून मी त्याला पाहिले नाही, पण जेव्हा मी त्याला पाहीन, तेव्हा मी त्याचे चांगले मूल्यांकन करू शकेन. अलीकडील सामन्यांमध्ये मी जे पाहिले आहे, त्यानुसार त्याला लाइन-लेंथ, यॉर्कर आणि विशेषतः बाउन्सरवर अधिक काम करण्याची गरज आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ह्या खूप प्रभावी गोलंदाजी आहेत.” (Gagandeep Singh coach statement)

टी20 फॉरमॅटमध्ये अर्शदीप सिंग भारतीय संघाचा स्टार आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये तो अजूनही व्यवस्थापनाचा विश्वास जिंकू शकलेला नाही. गगनदीप सिंग यांनी अर्शदीपच्या गोलंदाजीवर काम केले आहे.

त्याबद्दल त्यांनी सांगितले की, “जेव्हा मी पंजाब संघात सामील झालो, तेव्हा अर्शदीपने नुकतेच टी20 क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि एक हंगाम पूर्ण केला होता. त्यावेळी अर्शदीप स्टंपपासून दूर चेंडू टाकत होता आणि स्लो बॉल्सवर जास्त अवलंबून होता. पण रेड-बॉल क्रिकेटमध्ये हे काम करत नाही. त्यामुळे, आम्ही त्याची लाइन आणि लेंथ मजबूत करण्यावर, स्पॉट बॉलिंगवर आणि मनगटाची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. कटरवर अवलंबून न राहता नैसर्गिक स्विंगला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही चेंडू सीमवर टाकला जाईल, याची खात्री केली.” (Gagandeep Singh coach statement)

Comments are closed.