KKR vs PBKS: पंजाबनं जिंकला टॉस, केकेआरला गोलंदाजीचं आमंत्रण! पहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
यंदाच्या आयपीएल हंगामातील 44वा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs KKR) संघात खेळला जाईल. दरम्यान दोन्ही संघ ईडन गार्डन्सच्या मैदानावर आमनेसामने असतील. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज, तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाताचा संघ मैदानात उतरताना दिसेल. दरम्यान पंजाब किंग्जने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियंश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, अझमतुल्ला उमरझाई, मार्को जानसेन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रोव्हमन पॉवेल, वैभव अरोरा, चेतन सकारिया, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
यंदाच्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने चमकदार कामगिरी केली आहे. 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाबचा संघ गुणतालिकेत 10 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाताचा संघ 6 गुणांसह 7व्या स्थानावर आहे. दरम्यान आजच्या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Comments are closed.