पंजाबच्या विजयामुळे दोन संघ अडचणीत, प्लेऑफचं तिकीट अवघड!
आयपीएल 2025 स्पर्धेतील 49 सामने संपले आहेत आणि आता प्लेऑफच्या दिशेने सर्व संघ वाटचाल करत आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्स पहिला संघ ठरला आहे जो आयपीएल स्पर्धेतून तसेच प्लेऑफ मधून बाहेर पडला आहे.
पंजाब किंग्सने चेपॉकच्या मैदानावर विजय मिळवत चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना पूर्णविराम दिला आहे. चेन्नई हंगामातून तसेच प्लेऑफच्या रेस मधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. तसेच पंजाबच्या या विजयामुळे अजून दोन संघांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची वाट अवघड झाली आहे. पंजाब संघ आता पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
पंजाबच्या विजयामुळे लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. 10 सामन्यांमध्ये 13 गुण मिळवत आरसीबी संघाचे प्लेऑफ तिकीट पक्के मानले जात आहे. तसेच मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सुद्धा चांगल्या परिस्थितीत दिसत आहेत. त्यामुळेच आता लखनऊ आणि कोलकाता संघाच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. पंजाबचे आता 13 पॉईंट्स आहेत. यासोबतच त्यांनी चार मधील दोन सामने जिंकले तर श्रेयसच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान पक्के करेल.
Comments are closed.