कर्तव्यासाठी दुःखाचा डोंगर बाजूला! रिंकू सिंग भावूक होऊन टीम इंडियात परतला, म्हणाला..,

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 (icc T20 international world cup 2026) मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) पुन्हा एकदा संघात सामील होण्यासाठी रवाना झाला आहे. रिंकूचे वडील खानचंद सिंग यांचे 27 फेब्रुवारी रोजी नोएडामधील रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी तो अलीगडला आपल्या घरी गेला होता.
रिंकू सिंग 28 फेब्रुवारी रोजी कोलकाताला जाण्यासाठी घरातून निघाला तेव्हा तो प्रचंड भावूक झाला होता. जाताना त्याने आपल्या नातेवाईकांना आईची आणि कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती केली. कुटुंबानेही पाणावलेल्या डोळ्यांनी रिंकूला निरोप दिला. वडिलांच्या तेराव्या विधीसाठी तो पुन्हा घरी परतण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू शनिवारीच संघात सामील होईल. रिंकूच्या वडिलांना चौथ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर (यकृत कर्करोग) होता. 28 फेब्रुवारीच्या सकाळी मोठ्या भावाने अस्थी विसर्जन केल्यानंतर रिंकू कोलकात्यासाठी निघाला.
सेमी-फायनलमधील जागा निश्चित करण्यासाठी भारताला 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांचे प्रत्येकी 2-2 गुण आहेत, त्यामुळे जो संघ जिंकेल तो थेट सेमी-फायनलमध्ये प्रवेश करेल. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची आतापर्यंतची कामगिरी खूप चांगली राहिली आहे.
Comments are closed.