‘पुष्पा 2’ ने बाहुबलीचा विक्रम मोडला, काही तासातच केली एक हजार कोटींची कमाई
तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ने रेकॉर्डब्रेक कमाई करत बाहुबलीचाही विक्रम मोडला आहे. ‘पुष्पा 2’ 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल करत 22 डिसेंबर रोजी काही तासातच एक हजार कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय भाषिक चित्रपटाने असा रेकॉर्ड केला नाही.
‘पुष्पा 2’ ने अठराव्या दिवशी आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या बाहुबली-2 चा विक्रम मोडला आहे. दुपारी 3.25 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ‘पुष्पा 2’ ने 1043.95 कोटींची कमाई केली आहे. यानंतर ‘पुष्पा 2’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘पुष्पा 2’ ने सतराव्या दिवसापर्यंत 1029.9 कोटींची कमाई केली. आतापर्यंतचे चित्रपटाचे कलेक्शन पाहता ‘पुष्पा 2’ आणखी कमाईमध्ये विक्रम करेल असे बोलले जात आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा 2’ चे सुकुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. याआधी 2021 मध्ये ‘पुष्पा द राईझ’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी खेचली होती. ‘पुष्पा’च्या यशानंतर दिग्दर्शक सुकुमार यांनी ‘पुष्पा 2’ची घोषणा केली होती.
Comments are closed.