… तर युद्धाचा भडका उडेल! ट्रम्प- झेलेन्स्की भेटीपूर्वीच पुतिन यांचा गंभीर इशारा

गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन युद्ध थांबायचे नावच घेत नाहीय. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबले पाहिजे अशी भूमिका सर्व देशांची असल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शांतता चर्चेबाबत अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. पुतिन यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर युक्रेनने शांतता चर्चा मान्य केली नाही, तर रशिया सर्व लष्करी बळाचा वापर करून आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य करेल , असा इशारा दिला आहे.
रशियाने नुकताच कीववर सुमारे 500 ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रांचा मारा केला. ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुतिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुतिन यांच्या मते, युक्रेन सरकार या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यात फारसा रस दाखवत नाही. यापूर्वी अमेरिकेने दिलेला पहिला शांतता प्रस्ताव मान्य असल्याचे रशियाने जाहीर केले होते. मात्र, या प्रस्तावाला थेट युक्रेननेच विरोध केला होता. त्यामध्ये युक्रेनचे अध्यक्ष अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत.
रशियन सरकारी वृत्तसंस्था ‘TASS’ ने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी म्हटले आहे की, जर कीवमधील अधिकारी हा प्रश्न शांततेने सोडवण्यास तयार नसतील, तर रशिया आपल्या ‘विशेष लष्करी बळाचा वापर करून सर्व उद्देश पूर्ण करेल. कारण युक्रेनमध्ये शांतताकराराठी कोणतही तत्परता दिसून येत नाहीय. आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे व्लादिमीर पुतिन म्हणाले.
दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांनी रशियाच्या या भीषण हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. सुमारे 10 तास चाललेल्या या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 27 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जेलेन्स्की यांच्या मते, रशियाचा हा हल्ला या गोष्टीचा पुरावा आहे की मॉस्कोला युद्ध थांबवण्याची कोणतीही इच्छा नाही. या परिस्थितीमध्ये जेलेन्स्की आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्लोरिडा येथे भेट घेणार आहेत. या प्रस्तावित भेटीपूर्वीच युद्धातील तणाव वाढल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपूर्वीच हिंदुस्थानच्या दाैऱ्यावर आले होते. यादरम्यान हिंदुस्थान शांततेच्या बाजूने उभे असल्याचे स्पष्ट झाले.

Comments are closed.