परिस्थिती अधिकच भीतीदायक होत चाललीय; ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू दुबई विमानतळावर अडकली, भयानक अनुभव केला शेअर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. इराणने आखाती देशातील अमेरिकेच्या आठ तळांना लक्ष्य केले. सौदी अरब, कतार, कुवेत, बहरीन, अबुधाबी, दुबई, इराक आणि जॉर्डन येथे इराणने हवाई हल्ले केले. कतारचा अल उदैद हवाई तळ, कुवेतमधील अल सालेम हवाई तळ, यूएईचा अल धाफरा आणि बहरीनमधील यूएस फिफ्थ फ्लीट तळ इराणने उडवला. या युद्धामुळे जगभरात खळबळ उडाली असून वेगवेगळ्या विमानतळावर हजारो लोक अडकले आहेत. याचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून हिंदुस्थानची स्टार बॅटमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूही दुबई विमानतळावर अडकली आहे. परिस्थिती अधिकच भीतीदायक होत चालल्याचे म्हणत तिने भयानक अनुभव शेअर केला आहे.

Comments are closed.