वारंवार सांगूनही ऐकलं नाही! कतारने अमेरिकेसह ट्रम्प प्रशासनाला सुनावले खडे बोल; गॅस प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे संतापाचा स्फोट

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगावर मोठे ऊर्जा संकट उभे ठाकले आहे. अमेरिका-इस्रायलने इराणच्या तेल साठ्यांवर हल्ले केले आहेत. तर इराणनेही पलटवार करत आखातातील तेल-गॅस प्लांटवर हल्ले चढवले आहे. इराणने गॅस हबवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे कतारचे मोठे नुकसान झाले असून हे नुकसान भरून काढण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतील असा अंदाज आहे. यावरून कतारची सरकारी कंपनी कतार एनर्जीचे सीईओ साद अल-काबी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणच्या साउथ पार्स या जगातील सर्वात मोठ्या गॅस फील्डवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतार, सौदी अरेबिया, युएई आणि कुवैतच्या तेल आणि गॅस ठिकाणांना लक्ष्य केले. यात कतारचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यांच्या रास लाफान येथील एलएनजी रिफायनरीवर क्षेपणास्त्र डागण्यात आली. यामुळे कतारचे ऊर्जामंत्री आणि कतार एनर्जीचे प्रमुख साद अल-काबी यांनी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपला संताप व्यक्त केला.

मी सातत्याने अमेरिकन ऊर्जा मंत्री आणि संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना सावध करत होतो. इराणच्या गॅस ठिकाणांना हात लावू नका, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आम्हाला भोगावे लागतील, हे मी रोज सांगत होतो, असे काबी म्हणाले.

युद्ध हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर; इराणची क्षेपणास्त्रे थेट हिंद महासागरात; अमेरिका-ब्रिटनच्या लष्करी तळाला केले टार्गेट

इराणच्या हल्ल्यामुळे कतारची मुख्य कोल्ड बॉक्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. हे नुकसान इतके मोठे आहे की ते दुरुस्त करण्यासाठी 3 ते 5 वर्षांचा काळ लागू शकतो. तसेच इस्रायल इराणच्या गॅस फील्डवर हल्ला करणार आहे, याची कोणतीही पूर्वकल्पना कतारला देण्यात आली नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

Israel Iran War – जगातील ‘तेलकोंडी’ सोडवण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय; इराणच्या तेलावरील बंदी उठवली

दरम्यान, यावर आता व्हाईस हाऊसच्या प्रवक्त्या टेलर रोजर्स यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या टीमला गॅस पुरवठ्यात अडथळे येतील याची कल्पना होती. ही जोखीम लक्षात घेऊनच पुढील नियोजन करण्यात आले होते, असे त्या म्हणाल्या.

US Iran Israel War – होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये रणकंदन होणार; अमेरिकेच्या 3 युद्धनौका आणि 2500 मरीन कमांडो आखाताकडे रवाना

Comments are closed.