आर अश्विन CSK संघ सोडणार? जाणून घ्या मोठी अपडेट समोर !

आयपीएल 2026 (IPL 2026) साठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. संजू सॅमसन (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan royals) निरोप घेणार आहे. त्याने संघापासून वेगळं होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे आर. अश्विनही (R Ashwin) सीएसकेचा निरोप घेऊ शकतो. आता त्याचे मार्ग वेगळे होण्याची शक्यता आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आर. अश्विन आयपीएल 2026 पूर्वी सीएसके (Chennai super kings) संघ सोडू शकतो. असा अंदाज आहे की, अनुभवी ऑफ-स्पिनरने आपला निर्णय पक्का केला असून त्यांनी फ्रँचायझीला याबाबत कळवलं आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा स्टार खेळाडू एम. एस. धोनी (MS Dhoni) आणि कर्णधार रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांची चेन्नईत सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेट झाली होती. असं मानलं जातं की फ्रँचायझीने आगामी हंगामाबाबत चर्चा केली असावी.

अश्विनला सीएसकेने 9.75 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. त्याआधी तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. 2016 ते 2024 या काळात अश्विन दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्ससाठी खेळला. पण, अश्विनने आपलं आयपीएल करिअर सीएसकेपासूनच सुरू केलं होतं. 2009 ते 2015 पर्यंत त्याने ‘यलो आर्मी’चं प्रतिनिधित्व केलं.

आयपीएलमधील आतापर्यंतच्या 220 सामन्यांत अश्विनने 187 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. त्याशिवाय त्याच्या बॅटमधून 705 धावा आल्या आहेत. भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्येही अश्विनने कमाल केली आहे. 106 टेस्ट सामन्यांत त्याने 537 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याच्या नावावर 3503 धावाही आहेत.

Comments are closed.