IPL 2026: आर. अश्विनची मोठी एन्ट्री! आयपीएल स्पर्धेत या भूमिकेत दिसणार; बीसीसीआयने दिली महत्वाची जबाबदारी

चेन्नई सुपर किंग्सचा माजी स्टार फिरकीपटू आर. अश्विन (R. Ashwin) आयपीएल 2026 मध्ये एका नवीन भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मिनी ऑक्शनपूर्वीच त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती, त्यामुळे यावेळेस तो मैदानात गोलंदाजी करताना नाही, तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपली मते मांडताना दिसेल.

मैदानावर आपल्या फिरकीने भल्याभल्या फलंदाजांना नाचवणारा आर. अश्विन आता आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. ब्रॉडकास्टर्सनी जाहीर केलेल्या स्टार कॉमेंटेटर्सच्या यादीत अश्विनच्या नावाचा समावेश आहे. अश्विनला क्रिकेटची दांडगी समज आहे आणि त्याचे यूट्यूबवरही लाखो फॉलोअर्स आहेत, त्यामुळे त्याला ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अश्विनसोबतच यावेळेस सुरेश रैना, हरभजन सिंग, इरफान पठान, वीरेंद्र सहवाग, अनिल कुंबले आणि नवजोत सिंह सिद्धू यांसारखे दिग्गज मराठी आणि हिंदीत कॉमेंट्री करताना दिसतील. तसेच इंग्रजी कॉमेंट्रीसाठी रवी शास्त्री, सुनील गावस्कर, एबी डिविलियर्स आणि डेल स्टेन यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्सची निवड करण्यात आली आहे.

आर. अश्विनने आपला शेवटचा आयपीएल हंगाम 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळला होता. मिनी ऑक्शनपूर्वी अचानक निवृत्ती जाहीर करून त्याने सर्वांनाच चकित केले होते. गेल्या हंगामात त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या.

अश्विनची आयपीएल कारकीर्द पाहायचे झाल्यास, त्याने एकूण 221 सामने खेळले असून त्याने एकूण 187 विकेट्स घेतल्या आहेत. त्या दरम्यान त्याची सरासरी इकॉनमी 7.20 इतकी राहिली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने एकूण 5 वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

Comments are closed.