बेल सह रडार खरेदी करार

वायुदलाचे वाढणार सामर्थ्य : 2,906 कोटीचा व्यवहार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षमतांना मजबूत करण्याच्या प्रयत्नांच्या अंतर्गत संरक्षण मंत्रालयाने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)सोबत 2,906 कोटी रुपयांच्या खर्चाने लो-लेव्हर ट्रान्सपोटेंबल रडार (एलएलटीआर) (अश्विनी)च्या पुरवठ्यासाठी करार केला आहे. हा रडार पूर्णपणे स्वदेशी स्वरुपात डीआरडीओकडून डिझाइन अन् विकसित करण्यात आला आहे. हा करार नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत झाला.

अश्विनी रडार सक्रीय स्वरुपात इलेक्ट्रॉनिकली स्कॅन करण्यात आलेला फेज्ड एरे मल्टीफंक्शन रडार आहे. हा रडार उच्च वेग असलेल्या लढाऊ विमानांपासून कमी वेगाने उ•ाण करणाऱ्या लक्ष्यांना म्हणजेच ड्रोन किंवा युएव्ही तसेच हेलिकॉप्टर्सना ट्रॅक करण्यास सक्षम आहे. हा रडार उपलध झाल्यास भारतीय वायुदल संचालन तत्परतेत महत्त्वपूर्ण वृद्धी होणार आहे.

या रडारची कक्षा 200 किलोमीटरची आहे, तर हा रडार 30 मीटरपासून 15 किलोमीटरच्या उंचीपर्यंतच्या भागाला स्कॅन करू शकतो.  या रडारमध्ये इंटीग्रेटेड आयडेंटिफिकेशन फ्रेंड ऑर फो म्हणजेच स्वत:च्या आणि शत्रूच्या विमानाची ओळख पटवू शकतो. हा मोबाइल रडार अॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर वैशिष्ट्याने युक्त आहे. या रडारला कुठल्याही प्रकारच्या युद्धभूमीवर तैनात केले जाऊ शकते. उणे 20 अंशापासून 55 अंश तापमानात हा रडार सहजपणे ऑपरेट करता येऊ शकतो.

Comments are closed.