मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार लंडनमधून महाराष्ट्रात, 18 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल; पु.ल. देशपांडे कला अकादमीत ठेवणार

नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक व छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठी सैन्यातील महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार 18 ऑगस्ट रोजी लंडनहून मुंबईत आणली जाणार आहे. प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे ही तलवार ठेवण्यात येईल.
महाराष्ट्र सरकारने लिलावात ही तलवार जिंकली. सांस्पृतिक मंत्री आशीष शेलार यांनी लंडन येथे जाऊन ती ताब्यात घेतली. ही तलवार लिलावात काढली जात असल्याचे 28 एप्रिल रोजी समजल्यानंतर राज्य शासनाने तातडीने पावले उचलली होती. लंडनमधील हिंदुस्थानी दूतावासाशी संपर्प साधला गेला. सरकारच्या वतीने लिलावात एका मध्यस्थाच्या वतीने ही तलवार विकत घेण्यात आली. ती मुंबईत आणली गेल्यानंतर विमानतळावरूनच बाईक रॅली काढून वाजतगाजत ती दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आणण्यात येणार आहे.
सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्टय़े आहेत. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे.
Comments are closed.