रोहित-विराटने 2027 वर्ल्ड कप न खेळलेलाचं चांगला! माजी केकेआर खेळाडूच्या विधानाने चाहत्यांमध्ये खळबळ
विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांना 2027 चा वर्ल्ड कप खेळताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. दोघेही भारतीय क्रिकेटमधील मोठे सुपरस्टार आहेत आणि आपल्या करिअरच्या शेवटाकडे जात आहेत. वनडेमध्ये ते सातत्याने उत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे असं वाटतं की दोन वर्षांनी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट आणि रोहित नक्की खेळतील.
पण KKR कडून खेळलेला अफगाणिस्तानचा दमदार खेळाडू रहमानुल्लाह गुरबाज आपल्या विधानामुळे सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेला आहे. त्याला रोहित आणि विराट पुढचा वर्ल्ड कप खेळताना पाहायचे नाही आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीत गुरबाजने रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळतील की नाही यावर बोलताना म्हटले,अफगाणिस्तानचा खेळाडू म्हणून मला आनंद होईल, जर ते टीममध्ये नसतील. कारण जर ते नसतील, तर आमची जिंकण्याची शक्यता वाढेल. दोघेही दिग्गज आहेत. अशी कोणतीही टीम नाही जी विराट आणि रोहितला नको म्हणेल. पण जर ते टीममध्ये नसतील, तर विरोधी संघ नक्कीच खूश होतील.
गुरबाजने सांगितले की, जेव्हा तो अडचणीत असतो तेव्हा विराट कोहली त्याला मदत करतो. तो म्हणाला, जेव्हा मी संघर्ष करत असतो किंवा मला मार्गदर्शनाची गरज असते, तेव्हा मी विराट भाईला फोन करतो. आमची चर्चा होते. काही दिवसांपूर्वी मी धावा करत नव्हतो. मी त्याला फोन केला आणि पुढच्या सामन्यात मी जवळपास 90 धावा केल्या.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वनडेमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने दुसऱ्या वनडेमध्ये 73 आणि तिसऱ्या वनडेमध्ये नाबाद 121 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकाविरुद्ध रांची वनडेत रोहितने 57 धावा केल्या.
विराटकडूनही गेल्या दोन वनडे सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत नाबाद 74 धावा, आणि दक्षिण अफ्रिकाविरुद्ध पहिल्या वनडेत 135 धावा केल्या.
या कामगिरीवरून दोघेही 2027 चा वर्ल्ड कप खेळतील असं जवळपास ठरलेलं दिसत आहे.
Comments are closed.