राहुल द्रविडचा धक्कादायक निर्णय, राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा, पद का सो

राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड खाली पडले: टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारे राहुल द्रविड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयाची माहिती स्वतः राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनं सोशल मीडियावर दिली.


राजस्थान रॉयल्सनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी संघासोबतचा आपला कार्यकाळ पूर्ण करतील. अनेक वर्षांपासून ते रॉयल्सच्या प्रवासाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे खेळाडूंच्या एका पिढीला प्रेरणा मिळाली. संरचनात्मक पुनरावलोकनाचा भाग म्हणून त्यांना मोठं पद आणि अधिक जबाबदारी देण्याची ऑफर करण्यात आली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. रॉयल्स, त्यांचे खेळाडू आणि जगभरातील चाहत्यांच्या वतीनं आम्ही राहुल यांच्या अमूल्य योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानतो.” (Rahul Dravid steps down as Rajasthan Royals head coach)

राजस्थान रॉयल्ससाठी नाकारला होता ब्लँक चेक

टीम इंडियाला 2024 चं टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्षांनंतर भारतानं टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर अनेक फ्रँचायझींमध्ये त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी चुरस सुरू झाली होती. एका फ्रँचायझीनं तर ब्लँक चेक ऑफर केल्याचीही चर्चा होती. मात्र द्रविड यांनी आपल्या जुन्या संघ राजस्थान रॉयल्सचीच निवड केली होती.


पद का सोडलं?

आयपीएल 2025 दरम्यान संघामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कर्णधार संजू सॅमसन टीम मॅनेजमेंटवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण, राहुल द्रविडने (Rahul Dravid steps down as Rajasthan Royals head coach) त्या बातम्यांना बकवास म्हटले. द्रविडने कोणत्याही प्रकारच्या वादाला स्पष्टपणे नकार दिला.

हे ही वाचा –

‘त्यांची उणीव नेहमी भासेल…’ बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB चे मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे, 3 महिन्यानंतर घोषणा

आणखी वाचा

Comments are closed.